नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,
हे आर्टिकल खास मी तुमच्या आग्रहस्तोव लिहत आहे मला खूप विद्यार्थी मित्रांनी त्यांच्या रेल्वे एक्झाम सेंटर विषयी व परीक्षा लेवल विषयी प्रश्नांची विचारणा केली होती त्या सर्वांच्या प्रश्नांचे निराकरण मी ह्या लेखा मध्ये करत आहे.
मित्रांनो १७ ऑक्टोम्बर पासून सुरु झालेल्या रेल्वे परीक्षे विषयी बोलायचे झाले तर परीक्षा लेवल हि पहिल्या दिवसापासून ते आज पर्यंत सारखी आहे.रेल्वे ग्रुप डी ची परीक्षा महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथे होत असून हि परीक्षा कॉम्पुटर च्या साह्याने घेण्यात येत आहे.परीक्षा केंद्रात तुम्हाला कोणतीही वस्तू सोबत बाळगता येत नाही तुमचा पेन हि नाही सर्व काही तुम्हाला बाहेर ठेवावे लागेल.परीक्षेला जाण्यापूर्वी तुमच्या हॉल तिकीट वर फोटो चिपकवायचा आहे (जो तुम्ही परीक्षा फॉर्म भरतांना वापरला होता) परीक्षा केंद्रावर पोहचल्यावर आधी आपल्या ब्लॉक नंबर ची माहिती करून घ्या व परीक्षा देतांना कोणतेही दडपण घेऊ नका.परीक्षा सुरु होण्या आधी तुमचे बायोपिक व्हेरीफिकेशन होईल ज्यात तुमचा फोटो काढण्यात येईल व सोबतच तुमच्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा हि घेण्यात येईल .त्यानंगतर तुम्हाला कॉम्प्युटर वर दिसत असलेले declaration तुमच्या हस्ताक्षरात तुमच्या हॉल तिकिटावर खालील भागात भरावे लागेल व आपल्या हॉल तिकिटाचे दोन भाग करावे लागेल.ज्यातील एक परीक्षा झाल्यावर तुम्हाला देण्यात येईल व एक प्रत जमा केली जाईल.कॉम्पुटर वर परीक्षा देतांना तुम्ही उत्तरे दिलेले प्रश्न बाजूला हिरव्या रंगात दिसतील व न सोडवले प्रश्न लाल रंगात दिसतील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासमोर टिक केल्यनंगतर तुम्हाला पुढच्या प्रश्नासाठी save and next ह्या बटनावर क्लिक करावे लागेल .
टीप - परीक्षा देतांना आधी चालू घडामोडी व विज्ञानाचे प्रश्न आधी सोडवावे व त्यानंगतर बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न सोडवावे.
कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येत आहेत.
तुम्हाला दोन ते तीन प्रश्न दैनंदिन असे सोपे असतात जे कोणीही विद्यार्थी अभ्यास न करता देऊ शकतो.
विषयांचे विश्लेशण
१) चालू घडामोडी वर आधारित प्रश्न.
यात तुम्हाला प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल हे पाठ करावे लागतील त्याचप्रमाणे २०१७-१८ मधील सर्व पुरस्कार मग ते खेळातील असो अथवा फिल्मफेयर.मुख्यता आशियाई गेम्स २०१८ व नोबेल पारितोषिक २०१७,बुकर पुरस्कार ,बँकेचे व जगातील मोठ्या कंपन्यांचे ceo ,योजना,बाहुबली चित्रपटातील कॅरेक्टरवांवर आधारित प्रश्न हि विचारण्यात येत आहेत .
२) विज्ञान विषया वर आधारित प्रश्न.
विज्ञानात आवर्त सारणी विषयी प्रश्न विचारण्यात येत आहेत.व्हिटॅमिन,केमिकल फॉर्मुले ,बलाचे व गतीचे equations,काही साधारण प्रश्न,धातू अधातू विषयी प्रश्न, Ph मान, ग्रंथीं विषयी ह्या प्रमाणे प्रश्न विचारण्यात येत आहेत .
३) गणित ह्या विषया वर आधारित प्रश्न.
रेल्वे परीक्षेत सर्वात महत्वाचा आणि हमखास मार्क मिळवून देणारा विषय गणित ठरत आहे .
गणितात साधारण प्रश्न विचारण्यात येत आहेत ज्यात शेकडेवारि,वर्गमूळ,काळ काम वेग,नळ आणि टाकी,वयवारी,sin and thita,त्रिकोणां विषयी नफा तोटा विषयी प्रश्न बघण्यात येत आहेत .
४) बुद्धिमत्ता ह्या विषया वर आधारित प्रश्न .
साधारण नंबर सिस्टिम वर आधारित प्रश्न विचारण्यात येत आहेत.कॅलेंडर व क्लॉक, आकृत्या पूर्ण करणे,कथन व नित्कर्ष,अल्फाबेटिकल सिरीस यावर आधारित प्रश्न विचारण्यात येत आहेत .
मुंबईत परीक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची माहिती .
रेल्वे ने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी खर्चात पवई येथे जाता येणार ज्यासाठी तुम्हाला ठाणे रेल्वे स्टेशन वरून लोकल ने कंजूम रेल्वे स्टेशन ला जावे लागेल तेथून सिटीबस अथवा रिक्षाने सेंटर पर्यंत जावे लागेल ह्यासाठी शेरिंग रिक्शा ५० रुपये व बस १५ रुपये प्रत्येक कस्टमर ची घेते . त्याचप्रमाणे तुम्ही ट्रॅव्हल्स ने ही पवई जाऊ शकतात नवकार ट्रॅव्हल्स पवई पर्यंत सोडते.
तुम्हाला जर हे आर्टिकल आवडले असतील तर नक्की मित्रांमध्ये शेयर करा.तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट द्वारे कळवा.

ConversionConversion EmoticonEmoticon